‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजलं. या पर्वात मराठी कलाकारांपासून अगदी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सपर्यंत संधी देण्यात आलेली. या पर्वात ‘छोटा पुढारी’म्हणजेच, घनःश्याम दरोडेला खूप प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासूनच घनःश्याम दरोडे सोशल मीडियावर चर्चेत असतो. तसेच, तो त्याचे फोटो, व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना आपले अपडेट्स देत असतोच. अशातच घनःश्यामची लेटेस्ट सोशल मीडिया पोस्ट खूप चर्चेत आहे. खरंतर छोटा पुढारीनं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. वयाच्या 21व्या वर्षी त्यानं स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलंय.
छोटा पुढारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. या व्हिडीओमध्ये तो एका नव्या घरासमोर बसून कागदपत्रांवर सह्या करताना दिसतोय. त्यानं स्वतःचं हक्काचं घर खरेदी करुन स्वप्न पूर्ण केलंय. छोटा पुढारीनं व्हिडीओ शेअर करताना लिहिलंय की, “आज 21व्या वर्षी स्वतःच्या हिंमतीवर माझं पहिलं घर बुक केलंय…”
STORIES YOU MAY LIK
घनःश्याम दरोडेनं दाखवली चाहत्यांना घराची झलक
घनःश्याम दरोडेनं स्वतःच्या मालकीचं नवं घर घेतल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. व्हिडीओ शेअर करुन त्यानं चाहत्यांसोबत आपला आनंद शेअर केलाय. घनःश्याम म्हणाला की, “आज काय बोलू ते कळत नाहीये…डोळ्यांत पाणी येतंय. तुमच्या प्रेमापोटी मी आज इथपर्यंत पोहोचलोय”, असं तो व्हिडीओत म्हणाला आहे.
व्हिडीओ शेअर करताना घनःश्याम दरोडे म्हणालाय की, “आज 21व्या वर्षी स्वतःच्या हिमतीवर माझं पहिलं घर बुक केलं… आई-बाबांकडून एक रुपयाही न घेता मिळवलेलं हे घर माझ्या मेहनतीचं यश आहे. पण या यशामागची खरी कहाणी माझ्या कष्टांची नाही, तर आई-बाबांनी माझ्यासाठी आयुष्यभर केलेल्या त्यागाची आहे…”
पुढे बोलताना घनःश्याम दरोडे म्हणालाय की, “माझ्या प्रत्येक गरजेसाठी त्यांनी स्वतःच्या इच्छा मारल्या, माझं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली, माझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी त्यांनी कित्येकदा स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवलं… आज घराच्या चाव्या माझ्या हातात आहेत. पण या घराच्या प्रत्येक विटेत आई-बाबांच्या त्यागाचा एक तुकडा आहे. आई-बाबा… तुम्ही मला आयुष्यभर घर दिलंत, आज तुमच्या संस्कारांनी मी माझं स्वतःचं घर उभं केलं. ही माझी कमाई नाही, ही तुमच्या त्यागाला दिलेली माझी पहिली छोटीशी परतफेड आहे…”





























































