Dhananjay powar on Janhavi: ‘बिग बॉस’ फेम (Bigg Boss) आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) लवकरच आपल्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सायको रंगा’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून, सध्या अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान, तिनं केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे. ‘कोल्हापुरात असताना बिस्लेरीच्या पाण्याने आंघोळ करायची’, असं अभिनेत्री म्हणाली. तिच्या एका वक्तव्यामुळे कोल्हापूरकरांनी रोष व्यक्त केला. अनेकांनी तिला ट्रोल केलं. अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर धनंजय पोवारनेही (Dhananjay Powar) यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर ‘I Support Kolhapur’, असं म्हटलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे.
जान्हवी किल्लेकरबाबत धनंजय पोवार नेमकं काय म्हणाला? (Bigg Boss Fame Dhananjay powar on Janhavi Killekar Statement)
धनंजय पोवार ‘बिग बॉस’मध्ये झळकला होता. ज्यात जान्हवी किल्लेकरही होती. जान्हवी कपूरच्या व्हायरल व्हिडीओवर धनंजय पोवारने प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय पोवार म्हणाला की, ‘आपण कोल्हापूरकर म्हणजे प्रेमळ माणसं. प्रत्येकाच्या चुका पोटात घालणारी माणसं. आपल्या कोल्हापूरच्या लोकांची ओळख प्रेमळ, सुंदर, मनमिळाऊ आणि भाषेतील गोडव्यामुळे अशी आहे. मला असं वाटतं की, इथे कोणताही व्यक्ती स्वत:च्या सोशल मीडियातील व्ह्यूससाठी असं करतो असं नाही. त्यांची ती भावना आणि प्रेम आहे. मला लोकांनी कमेंट्समध्ये विचारलं की, तुम्ही कोल्हापूरच्या बाजूने आहात की जान्हवीच्या बाजूनं आहात?’.
STORIES YOU MAY LIKE
‘मी स्पष्ट सांगेन, मी कायम कोल्हापूरच्या बाजूने असेन. माझी मैत्री माझ्यापुरती मर्यादित. नात्याने मी तिला बहीण मानतो. ती मला दादा म्हणते. आज एक व्हिडीओ बघितला, त्यात तुम्ही तिच्या नवऱ्याला काळं डुक्कर म्हणालात. हे मला अजिबात आवडलेलं नाही, ही आपली भाषा नाही. कुणाच्या घरातील व्यक्तीवर आपण त्याच्या रंगावरुन किंवा वेषभूषेवरून नाही बोलू शकत. आपण कोल्हापूरकर असे अजिबात नाही आहोत’.
‘तुम्ही तिचा व्हिडीओ नीट बघा. तिला त्वचेचा प्रॉब्लेम आहे. कोल्हापुरातील पाणी खराब आहे, असं तिने म्हटलेलं नाही. जान्हवी किल्लेकरला त्वचेचा त्रास आहे, त्यामुळे ती बाहेर कुठेही गेल्यावर बिस्लेरीचं पाणी वापरते. असं ऐकताना आपल्याला कधीकधी अतिरेक वाटतो. किंवा अतिशय शहाणपणाचा विचार आहे, असं वाटतं. पण तो तिचा विचार आहे. तिला काय बोलायचं ती बोलेल, तिला पूर्ण अधिकार आहे’, असं धनंजय पोवार म्हणाला. ‘समजा जर ती चुकली असेल तर, तिच्या कानाला धरुन, कोल्हापुरात आणून सर्वांसमोर माफी मागायला लावेन, हेही तितकंच सत्य आहे. माझ्यात आहेत, तेवढी धमक. ती जर चुकली असती तर, मी बोललो असतो, तुझं चुकलंय, कोल्हापुरकरांची माफी माग. तिने तसं वाक्य वापरलेलं नाही’, असं धनंजय पोवार म्हणाला.





























































