साऊथ सिनेमा ‘उडल’ची ओटीटीवर चर्चा, थ्रिलर सिनेमा डोकं चक्रावून सोडेल.

0
10

डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या सस्पेन्स (Suspense Movie), थ्रिलर आणि क्राइम चित्रपटांची प्रेक्षकांकडून अधिक मागणी केली जात आहे. चित्रपटगृहानंतर प्रेक्षक ओटीटी रिलीजची  वाट पाहत असतात.  सध्या मल्याळम डार्क क्राइम थ्रिलर फिल्म ‘उडल’ (Udal) या सिनेमाची चर्चा सुरू आहे.  2022 साली रिलीज झालेला हा चित्रपट नाते, विवाहबाह्य संबंध (Extra Marital Affairs) आणि सूड  यांची एक गडद कथा सादर करतो. यातील बोल्ड आणि हिंसक दृश्यांमुळे या सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळाले आहे.   ‘उडल’ हा सिनेमा सध्या साइना प्लेवर स्ट्रीम होत आहे. या सिनेमाची सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड चर्चा होत आहे.

OTTवर ट्रेंडिंग सस्पेन्सफुल ‘उडल’ चित्रपटाची चर्चा ( Udal South Movie Trending on OTT Platform)

या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन रतीश रघुनंदन यांनी केले आहे. या सिनेमात इंद्रन्स, दुर्गा कृष्णा आणि ध्यान श्रीनिवासन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील मुख्य भूमिका शाइनी (दुर्गा कृष्णा) हिची आहे.  तिचा पती  रेजी (जूड एंटनी जोसेफ) हा कामानिमित्त शहरात असतो.  तर, रेजी आपली सासू आणि दृष्टीहीन सासऱ्यासोबत गावी राहते. तिची सासू आजारी असल्याकारणाने अंथरुणाला खिळलेली असते.  त्यामुळे सासूची काळजी घेण्याची जबाबदारी शाईनीवर असते.  रोज सासूची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे शाईनी वैतागते. या सगळ्यात तिची भेट जुना मित्र किरणसोबत होते. दोघांमध्ये अफेअर सुरू होतो. दोघांमध्ये अनैतिक संबंध तयार होतात.

शाईनीला वाटतं की, सासूचा काटा काढला तर, आपलं आयुष्य सुधारेल.  यानंतर किरणसोबत हात मिळवून ती आपल्या सासूचा काटा काढते. यानंतर स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो. शाईनीचा सासरा कुट्टी चायन यांना आपल्या पत्नीची हत्या झालं असल्याचं कळते.  शाईनीचा सासरा बदला घेण्याचा विचार करतात. कुट्टी चायन हे आपल्या घरातील  लाईट बंद करुन, दारे लॉक करुन, अंधारातच सून आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करतात. जरी सासरे दृष्टीहीन असले तरी, घरातील वस्तू आणि घरातील कानाकोपरा त्यांना ठाऊक असते. 

प्रेक्षकांना हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या चित्रपटात हिंसा आणि  अडल्ड कंटेंट असल्याकारणाने सेंसर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले आहे.  बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. हाजीब्स फिल्म्स बॅनर खाली तयार झालेला या चित्रपटाची निर्मित गोकुलम गोपालन यांनी केली आहे.  हा सिनेमा सध्या ओटीटीवर ट्रेंडवर आहे

LEAVE A REPLY