अभिनेतायच्या या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्री कुब्रा सैतनं संताप व्यक्त केला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडचा (Bollywood News) सुपरस्टार गोविंदाच्या (Govinda) आयुष्यात वादळ उठल्याचं पाहायला मिळतंय. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय. तर, त्यासाठी कारण गोविंदाचं एका अभिनेत्रीसोबत अफेअर ठरल्याचंही सांगितलं जातंय. अशातच काही दिवसांपूर्वी गोविंदा त्याच्या आगामी सिनेमाच्या हिरोईनसोबत (Komal Rani Swarnkar) ‘लालबागचा राजा’च्या चरणी नतमस्कक होण्यासाठी पोहोचला आणि त्यावेळचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ज्या अभिनेत्रीसोबत सूत जुळच्या चर्चा सुरू आहेत, ती अभिनेत्री गोविंदाची आगामी सिनेमातली को-स्टार कोमल राणी स्वर्णकार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर भरीस भर म्हणून गोविंदाची पत्नी सुनीताचा एक व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये सुनीतानं आरोप केलेत की, तिच्या आयुष्यात काही राक्षस आहेत, ज्यांचा वध करण्यासाठी तिनं देवाकडे प्रार्थना केलीय. आता या प्रकरणी बोलताना अभिनेत्री कुब्रा सैत हिनं एक व्हिडीओ गोविंदाची बाजू घेतली आहे. यासंदर्भातला सविस्तर व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केलाय.
कुब्रा सैतची इन्स्टा पोस्ट
अभिनेत्री कुब्रा सैतनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन म्हटलंय की, “तुम्ही सर्वांनी फॅन असणं कधी सोडलं आणि प्रायवेट इन्वेस्टिगेटर केव्हा बनलात?” कुब्रा पुढे बोलताना म्हणाली की, मी गोविंदाला लहानपणापासून पाहतेय. गोविंदा 90 च्या दशकातला सुपरस्टार, आयकॉन आणि लेजेंडपैकी एक. आजकाल एखादी स्त्री एखाद्या अभिनेत्याच्या आसपास किंवा त्याच्यासोबत दिसल्यास, तिला लगेचच ‘मिस्ट्री गर्ल’ किंवा ‘कथित गर्लफ्रेंड’ असं लेबल लावलं जातंय
इन्स्टा व्हिडीओमध्ये पुढे बोलताना कुब्रा म्हणाली की, ती गोविंदाला वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत, पण ती अभिनेच्याची पत्नी सुनीता अहुजाला भेटलीय. कुब्रा म्हणाली की, सुनीता स्पष्टवक्ती आणि विनोदी आहे. पण, अफवा पसरल्यानंतर सुनीता किंवा इतर कोणत्याही स्त्रीनं वारंवार स्पष्टीकरण द्यावं, असं म्हणत कुब्रानं आक्षेप नोंदवलाय.
सार्वजनिक जीवनातील लोकांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महिलांचा आदर केवळ एखाद्या मोठ्या किंवा गंभीर घटनेनंतर प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित नसावा. महिलांच्या निवडी आणि वैयक्तिक निर्णयांचा दैनंदिन जीवनातही आदर केला पाहिजे. कोणत्याही महिलेला तिच्या आयुष्याबद्दल किंवा निर्णयांबद्दल वारंवार स्पष्टीकरण देण्यास भाग पाडू नये, असं कुब्रा सैत म्हणाली आहे. तसेच, कुब्रानं बोलताना सर्वांना सल्लाही दिलाय. जर ते कोणाबद्दल काही सकारात्मक बोलू शकत नसतील, तर त्यांनी काहीही बोलू नये आणि एक चाहता म्हणून त्यांच्या कलेचा आनंद घ्यावा, असं कुब्रा सैत म्हणाली आहे.
गोविंदानं काय स्पष्टीकरण दिलेलं?
गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांनी एकत्र ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेलं. तेव्हापासूनच गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. अफवांना उधाण आल्यानंतर गोविंदानं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं. गोविंदा म्हणाला की, कोमलसोबतचं त्याचं नातं पूर्णपणे प्रोफेशनल आहे. ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी तिच्यासोबत जाण्यामागचा उद्देश त्याच्या ‘रूपा’ (Rupa) सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करणं हा होता. या अफवांवर भाष्य करताना गोविंदानं असाही दावा केलाय की, त्याच्या आणि त्याच्या कुटुंबात फूट पाडण्याचा तसेच त्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. त्याने याला एक सुनियोजित चाल असल्याचं म्हटलंय.





























































