‘मेलडी क्विन’ आशा भोसले (Asha Bhosle) यांनी 82 वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी सिनेमातील ऑडियन्सना हिट आणि अविस्मरणीय गाणी दिली आहेत. अवघ्या 10 वर्षांत त्यांनी सिगिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यांनी विविध गाणी सादर करुन संगीत विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. व्हेरिएशन देऊन त्यांनी बऱ्याच गाण्यात जीव ओतला. असाच एक किस्सा आशा ताईंच्या कल्ट गाण्याच्या संबंधित आहे. गाण्यात वेगळेपणा आणण्यासाठी त्यांनी गाणं गाण्यापूर्वी काही मिनिटांसाठी श्वास रोखून धरला होता. खूप वर्षांपूर्वी गायलेलं त्यांनी गाणं आजही ऑडियन्स आणि आशा भोसलेंच्या चाहत्यांमध्ये (Entertainment) अजरामर आहे. पार्ट्यांमध्ये हमखास (Dum Maaro Dum) हे गाणं वाजवलं जातं. ते गाणं नेमंक कोणतं? आशा भोसलेंच्या त्या गाण्याचा किस्सा काय? जाणून घेऊयात.
‘दम मारो दम’ हे गाणं गाण्यापूर्वी आशा भोसलेंनी का रोखून ठेवला होता श्वास
दिग्गज सिंगर आशा भोसले यांनी विविध भाषेतून आणि व्हेरिएशनमधून गाण्यांना अजरामर केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी अशा प्रकारची गाणी गायली आहेत, जे प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत. देवानंद आणि जीनत अमान यांचा 1971 साली रिलीज झालेला ‘हरे रामा, हरे कृष्णा’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील ‘दम मारो दम, मिट जाये गम’ हे गाणं आजही तितकंच प्रचलित आहे. आशा भोसले यांनी हे गाणं 55 वर्षांपूर्वी गायलं होतं. तर, या सदाबहार गाण्याचं संगीत आर.डी बर्मन यांनी दिलं होतं. हे गाणं वेगळ्या व्हेरिएशनने गाण्यात यावं, अशी इच्छा आर.डी बर्मन यांची होती.
‘दम मारो दम’ हे गाणं गाण्यापूर्वी आशा भोसले यांनी आपला श्वास काही वेळासाठी रोखून धरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, खरंतर आर.डी. बर्मन जेव्हा ‘दम मारो दम’ हे गाणं कंपोज करत होते, तेव्हा ते अशा आवाजाच्या शोधात होते, जे ऐकताना गायकाने नशेत गायलं आहे, असं वाटलं पाहिजे. झीनत अमान यांची या सिनेमात आणि गाण्यात मुख्य भूमिका आहे. आशा भोसले यांनी विशेष या गाण्यासाठी आपला श्वास रोखून धरला होता. ज्यामुळे आवाजात एक जडपणा आणि ऐकताना नशा वाटली पाहिजे. आशा भोसले यांनी या गाण्यात जीव ओतला.
जेव्हा ‘हरे रामा, हरे कृष्णा’ हा चित्रपट तयार झाला, सिनेमागृहात रिलीज झाला आणि गाणं रुपेरी पडद्यावर गाजलं, तेव्हा प्रेक्षकांना हे गाणं प्रचंड आवडलं. थिएटरमध्ये प्रेक्षकही या गाण्याच्या तालावर बेभान होऊन नाचले. साधारण 18 आठवडे हे गाणं टॉप हिटवर होते. भारतात ‘दम मारो दम’ हे गाणं 12 आठवडे नंबर वनवर होते. क्लब आणि पार्टीजमध्ये हे गाणं वाजवलं जात होतं. पण तुम्हाला ठाऊक आहे का? ऑल इंडिया रेडिओने काही काळासाठी ‘दम मारो दम’ हे गाणं बॅन केलं होतं. हे गाणं लोकांना अमली पदार्थांकडे वळण्यास प्रवृत्त करते, असे कारण देत तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. तरुण वर्गाला हे गाणं प्रचंड आवडलं. आशा भोसलेंच्या आवाजातील कल्ट गाण्याचे लिरिक्स आनंद बख्शी यांनी लिहिले.



























































